By  
on  

पाहा व्हिडीओ : 'हास्यजत्रा'च्या नायिकांनी धरला या ट्रेंडिंग गाण्यावर ठेका

सोशल मिडीयावर सध्या ट्रेंडिंग रिल्सचं युग पाहायला मिळतय. ज्यात अनेक विविध ट्रेंडिंग गाण्यावर विविध व्हिडीओ किंवा डान्स व्हिडीओ केले जातात. मनोरंजन क्षेत्रातील कलाकार तर उत्साहात या ट्रेंडमध्ये सहभागी होताना दिसतात. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कलाकारांचा तर अशा ट्रेंडमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतो. असाच एक व्हिडीओ 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या कलाकारांनी सोशल मिडीयावर शेयर केलाय. ज्याला हजारो लाईक्स मिळत असून हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

 

या व्हिडीओत  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील नायिका एकत्र पाहायला मिळत आहेत. या अभिनेत्रींनी नऊवारी साडी नेसून मराठमोळा लुक केलाय. आता छान नटून थटून तयार झाल्यावर रिल व्हिडीओ तर झालाच पाहिजे ना. मग काय या नायिकांनी मलामा पिता पिता दे... या ट्रेंडिंग गाण्यावर धमाल रिल व्हिडीओ केलाय.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय. या विनोदी अभिनेत्री  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून तर प्रेक्षकांचं मनोरंजन करतातच शिवाय सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही त्या सक्रिय असतात.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive