By  
on  

पाहा Photos : चंद्राच्या घायाळ करणाऱ्या अदा, ब्लॅक एन्ड व्हाईट फोटोंमधून अमृताने वेधलं लक्ष

'चंद्रमुखी' या चित्रपटातून अभिनेत्री अमृता खानविलकरचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे. विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असून प्रसाद ओक यांनी याचं दिग्दर्शन केलय. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमृता खानविलकरने हटके फोटोशूटही केलय.

नुकतेच अमृताचे ब्लॅक एन्ड व्हाईट फोटो  समोर आलेत. साडी, बिंदी, मोकळे केस असा अमृताचा सुंदर लुक यात पाहायला मिळतोय. अमृताच्या चंद्रारुपी अदा या फोटोंमधून लक्ष वेधून घेत आहेत.

सोशल मिडीयावर अमृताच्या चाहत्यांनीही या फोटोंना पसंती दिली असून लाईक्सचा वर्षाव केलाय. लवकरच या चित्रपटातून चंद्रा पाहायला मिळणारे, ती कशी असेल हे चित्रपटातून उलगडेलच. मात्र नुकतच चित्रपटातलं चंद्रा हे गाणं प्रदर्शित झालं असून सोशल मिडीयावर या गाण्याला तुफान प्रतिसाद आहे. तर लवकरच चित्रपटातील आणखी एक गाणं लवकरच प्रदर्शित होणारेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive