By  
on  

हा दिग्दर्शक 'शेर शिवराज' चित्रपटात दिसणार शिवरायांचा शूर मावळा बहिर्जी नाईकांच्या भूमिकेत

'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' या शिवराज अष्टकातील मागील तीन चित्रपटांनंतर आता लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर 'शेर शिवराज' हा चित्रपट घेऊन येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अफझलखानाचा खात्मा, त्याचा इतिहास या चित्रपटातून पाहायला मिळेल. दिग्पाल यांच्या शिवराज अष्टकातील मागील काही चित्रपटात विविध भूमिका साकारणारे कलाकारच याही चित्रपटात विविध भूमिका साकारताना दिसतील. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता चिन्मय मांडलेकरच पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकेल.

'शेर शिवराज' या चित्रपटातील विविध भूमिकांचा उलगडा होताना दिसतय. नुकतच या चित्रपटातील बहिर्जी नाईक कोण साकारणार हे समोर आलय. तर हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक स्वत: दिग्पाल लांजेकर ही भूमिका साकारणार आहेत. नुकतच या चित्रपटातील शिवबा राजं हे गाणं देखील प्रदर्शित करण्यात आलय. मात्र ही भूमिका नेमकी कुणाची याचा अंदाज बांधला जात असतानाच दिग्पाल स्वत: बहिर्जी नाईक साकारणार असल्याच समोर आलय. 

 

बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाज महाराजांचे शूर मावळे होते. ते शिवरायांच्या सैन्यात गुप्तहेर म्हणून काम करत असे. अशा बहिर्जीची भूमिका दिग्पाल साकारत असल्याने ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या 22 एप्रिल रोजी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive