By  
on  

पाहा Video : अमृताने चंद्रमुखीसाठी केली ही गोष्ट, म्हणते "माझ्या दिग्दर्शकाला  सगळं ओरिजिनल हवं होतं"

चित्रपटातील एखाद्या भूमिकेसाठी कलाकार स्वत:ला अक्षरक्षह: झोकून देतात. वजन कमी करण्यापासून वाढवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी करण्याची त्यांची तयार असते. असचं काहीसं केलय अभिनेत्री अमृता खानविलकरने. 'चंद्रमुखी' चित्रपटाच्या निमित्ताने तिला ही गोष्ट तिला करावी लागलीय. याविषयीचा खास व्हिडीओ देखील अमृताने सोशल मिडीयावर शेयर केलाय.

अमृताने 'चंद्रमुखी' चित्रपटाच्या शुटींगसाठी चक्क तिचं नाक टोचून घेतलय. चंद्रा या भूमिकेसाठी नथ घालावी लागणार असल्यानं कोणतीही क्लिप असलेली नथ न लावता खरीखुरी नथ घालण्यासाठी तिने नाक टोचून घेतलं होतं. हा व्हिडीओ तिने सोशळ मिडीयावर शेयर केलाय. नाक टोचल्यावर अमृताच्या डोळ्यात अश्रू होते. याआधीही अडीच वर्षांपूर्वी नाक टोचल्याचं अमृता सांगतेय. मात्र ते बुजलं असल्याने तिला पुन्हा टोचावं लागलं. 

 

या पोस्टमध्ये अमृता म्हणते की, "नथ आणि चंद्रमुखी, माझ्या दिग्दर्शकाला  सगळं ओरिजिनल हवं होतं .... तेव्हा “अमृता नाक टोचायचं .... क्लिप वाल्या नथी मी तुला घालू देणार नाही”असं त्यांनी पहिल्याच मीटिंग मध्ये सांगितलं ... आणि म्हणूनच अश्या पद्धतीने मी अडीच वर्षां पूर्वीच नाक टोचलंत्या नंतरही ते बुजलं .... दुखलं .....मग परत टोचावं लगलं ... पण शूटिंग पर्यंत नथ आणि माझी जुगलबंदी सुरूच राहिली ....त्यात पिनजी गाडगीळ एन्ड सन्स ह्यांनी खऱ्या सोन्याच्या नथीं केल्या तेवहा नाचताना त्या इतक्या जड होत असत कि पॅक-अप नंतर त्या वरचं रक्त आधी कोमट पाण्याने आम्ही काढायचो आणि मग नाथ काढायचो तर चंद्रा ची कुठली नथ तुम्हाला जास्त आवडली ओ ?"

याआधी 'हिरकणी' या चित्रपटासाठी देखील प्रसाद ओक यांनी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला नाक टोचायला सांगितलं होतं. सोनालीनेही तिचा नाक टोचतानाचा व्हिडीओ शेयर केला होता. आता चंद्रमुखीसाठीदेखील अमृताने नाक टोचून चंद्राची तयारी केली. तेव्हा या सगळ्या मेहनतीनंतर हा चित्रपट कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive