By  
on  

मोठ्या कालावधीनंतर नाना पाटेकर या चित्रपटातून येणार समोर

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हे बराच काळ अभिनयापासून दूर दिसले आहेत. मात्र बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर एका खास चित्रपटातून ते च्या भेटीला येणार आहेत. त्यांचा आगामी चित्रपट ‘द कन्फेशन’चा टीझर पोस्टर नुकताच प्रदर्शित झालाय. ज्याची झलक सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या टीझरनंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता असल्याचं दिसतय.  

या प्रदर्शित झालेल्या टीझर पोस्टरमधून काही अंदाज बांधण कठीण होतय मात्र नाना मोठ्या कालावधीनंतर चित्रपटात दिसणार असल्यानं प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असणार यात शंका नाही. 

 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द कन्फेशन’ चित्रपटाच्या टीझरमध्ये त्यांचा भरदस्त आवाज ऐकू येतोय. केवळ 22 सेकंदांच्या या टीझरने सोशल मिडीयावर चर्चा निर्माण केलीय. तेव्हा या चित्रपटात नाना कोणत्या भूमिकेत असतील आणि नेमकं काय पाहायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अनंत महादेवन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive