या वाहिनीने थेट लग्नसोहळ्यात नव दाम्पत्याला पाठवला आहेर

By  
on  

विविध मालिका आणि कार्यक्रमांचे हटके प्रमोशन करताना विविध वाहिन्या दिसतात. मात्र झी मराठी वाहिनीने असं काही केलय ज्याने एका नव दाम्पत्याच्या नव्या सुरुवातीला आनंदमयी केलय. सध्या 'बँड बाजा वरात' हा नवा कार्यक्रम ही वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आलीय. 

सध्या लग्नसराई सुरु असताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका लग्नसोहळ्यात आहेर पाठवण्यात आलाय. या नव दाम्पत्याला झी मराठी वाहिनीने लग्नात थेट आहेर पाठवला आहे. 

'बँड बाजा वरात' या कार्यक्रमात नुकताच देवमाणूस मालिकेतील डिम्पल आणि अजितकुमार देवने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांना मालिकेतील लग्नाच्या विशेष भागाच्या निमित्ताने आहेर मिळाला. आणि हाच आहेर देवमाणूसच्या टीमने सोलापुर जिल्ह्यातील बार्शी येथील ऋतुजा आणि प्रदीप यांच्या लग्नसोहळ्यात दिलाय. या वाहिनीने पाठवलेला आहेर पाहुन नव दाम्पत्याच्या आनंदाला उधाण आलं.

 

Recommended

Loading...
Share