देसी गर्ल प्रियांका चोप्राही 'चंद्रमुखी'च्या प्रेमात, चित्रपटासाठी दिल्या शुभेच्छा

By  
on  

प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी चित्रपटाला प्रदर्शनाआधीच मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया मिळत आहेत. चित्रपटाची गाणी आणि ट्रेलरला तुफान प्रतिक्रिया मिळताना दिसत आहेत. यातच विविध कलाकारांकडून या चित्रपटाला शुभेच्छा मिळत आहेत. चित्रपटातील चंद्रा या गाण्यावर सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात डान्स व्हिडीओ करण्यात आलेत.

बॉलीवुडची देसी गर्ल प्रियांका चोप्रालाही चंद्रमुखी चित्रपटाची उत्सुकता आहे.  म्हणूनच की काय प्रियांकाने चंद्रमुखीच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांकाने ट्विटरवर या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रियांका या ट्विटमध्ये म्हणते की, "अभिनंदन आदिनाथ कोठारे, 29 एप्रिलला चंद्रमुखी पाहा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात" असं म्हणत प्रियांकाने शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांकाने आदिनाथ कोठारेचं अभिनंदन करणारं ट्विट केलय. 

येत्या 29 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटाला अजय - अतुल यांचं संगीत लाभलय. प्रसाद ओक दिग्दर्शिक या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर चंद्राच्या भूमिकेत तर आदिनाथ कोठारे हा दौलत देशमानेच्या भूमिकेत दिसेल. याशिवाय समीर चौगुले, मृण्मयी देशपांडे, प्राजक्ता माळी आणि इतर कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. 

 

Recommended

Loading...
Share