विराजस कुलकर्णीने शिवानीसाठी घेतला हा भन्नाट उखाणा...

By  
on  

किचन कल्लाकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजकारणी ते कलाकार असे विविध व्यक्ति या मंचावर येतात. या कलाकारांची किचनमध्ये उडालेली तारांबळ पाहणं मजेशीर ठरतं. शिवाय गप्पांचा फडही रंगताना पाहायला मिळालय. 

या कार्यक्रमाच्या आगामी भागात प्रेक्षकांना एक सेलिब्रिटी जोडपं पाहायला मिळणार आहे.या खास भागासाठी हजेरी लावली ती अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे या गोड जोडीने. या दोघांनी किचन कल्लाकारच्या किचनमध्ये एकत्र कल्ला केला. त्यांच्या पाककलेसोबतच धमाल मस्ती प्रेक्षकांना या खास भागात पाहायला मिळणार आहे. या भागाचं मुख्य आकर्षण ठरणार ते म्हणजे विराजसने शिवानीसाठी घेतलेला मजेदार उखाणा. विराजसने शिवानीसाठी खास उखाणा घेत म्हटला की, "किचन कल्लाकारच्या मंचावर करायचंय आम्हाला श्रीखंड, शिवानी सोबत आहेच आता घेऊ का हे भांडं?"

विराजसचा उखाणा ऐकून उपस्थित मंडळी हसून हसून लोटपोट झाले. तेव्हा ही खास जोडी या भागात आणखी काय धमाल करतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.   या दोघांसोबत या भागात रेणुका शहाणे आणि अभिनेता पुष्कराज चिरपुटकर देखील दिसतील.

लवकरच विराजस आणि शिवानी लगीनगाठ बांधणार आहेत. 7 मे रोजी पुण्यात हा लग्नसोहळा पार पडणार आहे. 

Recommended

Loading...
Share