'किचन कल्लाकार'च्या मंचावर वैभव मांगलेंची हजेरी, शेयर केली कांदेपोहे आणि आईची ही खास आठवण

By  
on  

किचन कल्लाकार या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावतात. कधी राजकारणी तर कधी कलाकारांची किचनमध्ये धमाल उडताना दिसते. या कार्यक्रमालाही प्रेक्षकांचा आता उदंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय.

या कार्यक्रमाच्या आगामी भागात अभिनेता वैभव मांगले, अभिनेत्री अन्विता फलटणकर आणि संस्कृती बालगुडे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात उत्तम पदार्थ बनवून महाराजांना खुश कोण करणार ते प्रेक्षकांना लवकरच कळेल पण या भागात प्रेक्षकांना कलाकारांनी शेअर केलेल्या काही सुंदर आठवणी देखील पाहायला मिळतील. 

अभिनेता वैभव मांगले आपल्या आठवणींना उजाळा देत म्हणाले, "मला पोहे भयंकर आवडतात. लहानपणी गावी वाढदिवसाला केक वगैरे कापणं नसायचं. तेव्हा आई विचारायची कि तुझ्या आवडीचं काय बनवू? तर मी तिला फक्त कढईभर कांदेपोहे बनवायला सांगायचो आणि ती माझ्यासाठी कांदेपोहे बनवायची ते मी दिवसभर गरम करून खायचो."

Recommended

Loading...
Share