आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या मतदानाचे वारे जोरदार वाहु लागले आहेत. सकाळपासुनच कर्तव्यदक्ष उमेदवाराला मतदान करण्यासाठी सामान्य नागरीक मतदान केंद्राबाहेर रांग लावुन उभा राहीला आहे.
यामध्ये आपले सेलिब्रिटी सुद्धा मागे नाहीत. आर्या आंबेकर आणि किशोरी शहाणे यांनी मतदानाच्या सुरुवातीलाच मतदान केंद्रावर जाऊन एक जबाबदार नागरीक म्हणुन आपलं कर्तव्य पार पाडलं. किशोरी शहाणे सहकुटूंब मतदानास गेल्या होत्या. तर आर्या आंबेकरने मतदान केल्यानंतर फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.
विधानसभा निवडणुकांचे निकाल 24 ऑक्टोबरला असणार आहेत. कोणाची सत्ता येईल, कोणता उमेदवार निवडुन येईल हे त्या दिवशीच कळेल. पण सर्वप्रथम एक जबाबदार नागरीक म्हणुन मतदानाचं कर्तव्य पार पाडणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.