By  
on  

पाहा Trailer: काहीशी बोल्ड, काहीशी सोज्वळ असा आहे 'कुलकर्णी चौकातला देशपांडे' मधील सई ताम्हणकरचा अंदाज

आयुष्याच्या वळणावर येणा-या वेगवेगळ्या नात्यांचा प्रवास उलगडवणा-या ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरची सुरुवात सई ताम्हणकरच्या बोल्ड वाक्याने होते आणि त्यानंतर टप्याटप्याने उलगडत गेली सईने साकारलेल्या भूमिकेची झलक. सईसोबत या चित्रपटात अभिनेते निखिल रत्नपारखी आणि राजेश श्रृंगारपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

निखिलने साकारलेले सईच्या नव-याचे पात्रं हे कसे आहे, त्याचा स्वभाव कसा आहे याची कल्पना प्रेक्षकांना आलीच असेल आणि अशा व्यक्तीसोबत संसार करणे म्हणजे महा कठीण. अशा वेळी राजेशने साकारलेल्या पात्राची सोबत मिळणे, सईचे मन नव्याने आनंद आणि मानसिक सुख शोधणे हा प्रवास सुरु होतो. पण स्त्री आणि बायको यामध्ये अडकलेली आई नेमका कशाचा विचार करते याचा उलगडा प्रेक्षकांना होणार आहे 


मध्यमवर्गीय बंडखोर बाईची एक बंडखोर गोष्ट असलेला ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपटाचे दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांनी केले आहे आणि ते नेहमीच आजपासच्या गोष्टींमधून वेगळा दृष्टिकोन मांडणारा चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात.

स्मिता फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्मिता गानू यांनी केली आहे तर सहनिर्मिती अजित माधवराव पोतदार आणि सीमा निरंजन अल्पे यांनी केली आहे. प्रशांत गोखले हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. झपाट्याने बदलणा-या आजच्या काळात नात्यांचा अक्षांश रेखांशला छेद देणारा .‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपट २२ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive