मराठी सिनेसृष्टीत छोट्या छोट्या आणि महत्वपूर्ण भूमिकांमधून स्वतःची छाप पाडणारे अनेक आहेत. त्यात अग्रस्थानावर आहेत ते म्हणजे जयवंत वाडकर. अर्थात सर्वांचे लाडके 'वाड्या'जी. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीमध्ये मध्यवर्ती भूमिकांमध्ये दिसणारे जयवंत वाडकर त्यांच्या फोटो काढण्याच्या आवडीमुळे खूप लोकप्रिय आहेत. मराठी सिनेसृष्टीत त्यांना 'फोटोकिंग' म्हणून ओळखले जाते.
जयवंत वाडकरांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात जयवंत वाडकर आपल्या मुलीसोबत 'जय जय शिवशंकर' या गाण्यावर धमाल नाचताना दिसत आहेत.
जयवंत वाडकर यांच्या मुलीचं नाव स्वामिनी असून तिने 'एफयू' आणि 'अशी ही आशिकी' या सिनेमांमध्ये स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
जयवंत वाडकर यांची मुलगी स्वामिनी ही लक्ष्मीकांत बेर्डे यांची कन्या स्वानंदीची जिवलग मैत्रीण आहे. दोघींचे एकत्रित बरेच फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. एकूणच वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत स्वामिनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःची छाप कशी निर्माण करणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.