By  
on  

ऐतिहासिक सिनेमांचे चाहते आहात? तर पुढचे काही आठवडे तुमच्यासाठी असणार पर्वणी

सध्या बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये ऐतिहासिक सिनेमांची लाट आली आहे. इतिहासाची सोनेरी पानं या सिनेमांमधून रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. सर्व सिनेप्रेमींना आणि विशेषकरून ऐतिहासिक सिनेमांची आवड असणाऱ्या रसिकांसाठी पुढचे दोन महिने पर्वणी असणार आहे. 

यातील पहिला सिनेमा म्हणजे नुकतंच प्रदर्शित झालेला 'फत्तेशिकस्त'. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं एक शौर्यपर्व दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, तानाजी मालुसरे आदी कलाकारांच्या या सिनेमात भूमिका असणार आहेत. 

डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. मराठा आणि मुघलांमध्ये झालेल्या तुंबळ रणसंग्रामावर हा सिनेमा आधारित आहे. अर्जुन कपूर, कृती सेनन, मोहनीश बेहेल, रवींद्र महाजनी, गश्मीर महाजनी आदी कलाकारांच्या या सिनेमात मुख्य भूमिका असणार आहेत. 'पानिपत' ६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

त्यानंतर नव्या वर्षात अर्थात ६ जानेवारी २०२० मध्ये अजय देवगणचा बहुप्रतीक्षित 'तान्हाजी' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रांगडा मावळा तान्हाजी मालुसरेची शौर्यगाथा या सिनेमाच्या केंद्रस्थानी आहे. ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमात अजय देवगण तान्हाजींची भूमिका साकारत आहे तर शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे. याचसोबत सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive