By  
on  

Video: चाहत्यांच्या प्रेमाने भारावला स्वप्नील जोशी

मराठी सिनेसृष्टीतील हँडसम चॉकलेट हिरो म्हणजे स्वप्नील जोशी. मराठीमधल्या या सुपरस्टारचे असंख्य चाहते आहेत. स्वप्नील सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असतो. 

स्वप्नील एका कामानिमित्त गाडीतून गेला असताना स्वप्नील जोशीला चाहत्यांच्या प्रेमाचा असाच प्रत्यय आला. स्वप्नील जोशी गाडीतून प्रवास करताना नजीकच्या शाळेतल्या मुलांनी स्वप्नीलच्या गाडीभोवती घेराव घातला आणि स्वप्नीलजवळ स्वाक्षरीची मागणी केली. स्वप्नीलने सुद्धा या छोट्या मुलांच्या प्रेमाचा स्वीकार केला. त्यांच्याशी हस्तांदोलन केले. 

'हेच प्रेम मेहनत करण्याचं बळ देतं', अशा शब्दांमध्ये या गोष्टीविषयी स्वप्नीलने भावना व्यक्त केल्या. स्वप्नील लवकरच 'बळी' या मराठी हॉररपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive