By  
on  

पाहा First Look : सिद्धार्थ मेनन - नेहा पेंडसे 'जून'मधून रसिकांच्या भेटीला

सध्या मराठी सिनेमांमध्ये अनेक नवनवीन विषय आणि हटके जोड्या पाहायला मिळत आहेत. अशीच एक नवी आणि फ्रेश जोडी 'जून' या मराठी सिनेमातुन पाहायला मिळणार आहे. नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेनन ही हटके जोडी या रोमँटीक सिनेमात प्रमुख भुमिका साकारणार आहे. या सिनेमाचं पोस्टर आज रिव्हील झालं आहे, विशेष म्हणजे आज नेहा पेंडसेच्या वाढदिवसादिवशी.

भुतकाळातुन अथवा वर्तमानातुन आपण ज्या गोष्टी निवडतो त्याच गोष्टींचा आपल्या भविष्यावर परिणाम होत असतो, हे सांगणारं कोणीतरी हवं असतं. 'जून' ही अशाच दोन व्यक्तींची कथा आहे. या सिनेमाचं पोस्टर मराठी-हिंदीतला सुपरस्टार रितेश देशमुखने शेयर केलं आहे. त्यामुळे या सिनेमाविषयी उत्सुकता आणखी वाढली आहे. 

'जून' मध्ये नेहा पेंडसे, सिद्धार्थ मेनन सोबतच किरण करमरकर आणि अभिनेत्री रेशम यांच्याही महत्वपुर्ण भुमिका आहेत. वैभव खिस्ती आणि सुहृद गोडबोले यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा हटके सिनेमा पुढील वर्षी अर्थात 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive