'तो अवयव शरीरापासुन वेगळा करुनच त्यांना शिक्षा दिली पाहीजे', मराठी कलाकारांचा संताप

By  
on  

संपुर्ण देशात सध्या प्रियंका रेड्डीच्या निघृण हत्येचे पडसाद उमटत आहेत. हैद्राबाद येथील डाॅक्टर प्रियंका रेड्डीवर सामुहिक बलात्कार करुन तिला जीवंत जाळण्यात आले. या प्रकरणाचा देशभरातुन निषेध होत आहे. याविषयी मराठी कलाकारांनी सुद्धा सोशल मिडीयाच्या माध्यमातुन आपला संताप व्यक्त केला आहे. 

याविषयी सुबोध भावेने ट्विट करत लिहीले आहे," ज्या छोट्याश्या अवयवाच्या जोरावर यांना माज आलाय तै अवयय शरीरापासुन वेगळा करुन आरोपींना शिक्षा जाहीर केली पाहीजे. जो देश स्त्रियांचा सन्मान करु शकत नाही तो स्वतःचा सत्व गमावतो." 

 

तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने,"दरवर्षी महिला सुरक्षेचा प्रश्न गल्लीपासुन दिल्लीपर्यंत पेटतो, मग?" असा उद्विग्न सवाल उपस्थित केला आहे. 

या घटनेतील आरोपींना पोलीसांनी पकडले असुन माणसुकीला काळीमा फासणा-या या घटनेने संपुर्ण देश हादरुन गेला आहे.

Recommended

Loading...
Share