By  
on  

संकर्षण कऱ्हाडे आणि भक्ती देसाई म्हणतात, 'तू म्हणशील तसं'

मराठी रंगभूमीवर सध्या अनेक नवी नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजच्या पिढीच्या आयुष्याशी संबंधित विषय सध्याच्या मराठी नाटकांमधून मांडले जातात. असंच एक नाटक मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्या नाटकाचं नाव आहे 'तू म्हणशील तसं' या नाटकाची विशेष गोष्ट अशी अभिनेता प्रशांत दामले यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. तर प्रसाद ओकने हे नाटक दिग्दर्शित केलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

जरा मॅनली दिसावं म्हणतोय... ‍ मिशा वगैरे वाढवून... काय वाटतं... कसा दिसेन मी?? गौरी थिएटर निर्मित, पुणे टॉकिज प्रस्तुत , ‘तू म्हणशील तसं’... ♥️ दिग्दर्शक – प्रसाद ओक निर्माती - गौरी प्रशांत दामले मुख्य भूमिकेत – संकर्षण कऱ्हाडे, भक्ती देसाई नाटकाच्या अपडेट्ससाठी फेसबुकवर https://www.facebook.com/TuMhanshilTasa/ या पेजला लाईक करा.5 डिसेंबरपासून ‘बुक माय शो’वर तिकिटे उपलब्ध.

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade) on

या नाटकाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून या पोस्टरमध्ये संकर्षण संकर्षण कऱ्हाडे आणि भक्ती देसाई यांची आंबटगोड केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. नवरा-बायकोच्या नात्यावर आधारित हे नाटक पाहायला सर्वजण आतुर आहेत. 

गौरी थिएटर निर्मित, पुणे टॉकिज प्रस्तुत 'तू म्हणशील तसं' हे नाटक संकर्षण कऱ्हाडेने लिहिलं आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २० डिसेंबर रोजी मुंबईत संपन्न होणार आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive