By  
on  

पाहा रिंकू-चिन्मयच्या 'मेकअप'चं नवीन पोस्टर

मेकअप या चित्रपटात रिंकू राजगुरू हिची प्रमुख भूमिका असून टिझरमध्ये चिन्मय उदगीरकरही दिसत आहे.या सिनेमाचं नवं कोरं आणखी एक पोस्टर सिनेरसिकांसमोर उलगडलं आहे.इथे डॉक्टरच मेकअप करतोय. रिंकूची यात दोन भिन्न रूपे पाहायला मिळत आहेत. रिंकूच्या 'मेकअप'चे प्रतिबिंब आपण नुकतेच 'मेकअप' चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये पाहिले. आता या सिनेमाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

या पोस्टरमध्ये चिन्मय उदगीरकर आणि रिंकू राजगुरू  दिसत आहे. या पोस्टरमध्ये चिन्मयच्या भूमिकेवरून पडदा उठवण्यात आला असून, डॉक्टरांच्या वेशभूषेत असलेला चिन्मय स्टेट्स्कोप घेऊन 'पूर्वी'चे म्हणजेच रिंकूचे डोके तपासताना दिसत आहे. खरी 'पूर्वी' कोणती हे शोधण्यासाठी तर चिन्मय तिला तपासात नसावा ना? दोन वेगवेगळी रूपे घेऊन वावरणाऱ्या 'पूर्वी'ला कोणत्या गोष्टीमुळे असे सोंग करावे लागत आहे हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावर समजेलच. तत्पूर्वी चिन्मय 'पूर्वी'ला तिच्या या सोंगात मदत करणार की त्याला विरोध करणार हे बघण्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे.

आपल्या खऱ्या चेहऱ्यावर रंगरंगोटी करून समोर आलेला दुसरा चेहरा म्हणजे मेकअप. हा मेकअप केवळ चेहऱ्याचाच असतो असे नाही, हा मेकअप व्यक्तिमत्वाचाही असू शकतो. आता व्यक्तिमत्वाचा मेकअप कसा असेल, हा प्रश्न जर तुमच्या डोक्यात आला असेल तर याचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळणार आहे. गणेश पंडित दिग्दर्शित 'मेकअप' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मेकअप'च्या जबरदस्त टिझरनंतर आता या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे.
 

रिंकू आणि चिन्मयच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक फ्रेश जोडी पाहायला मिळेल. चित्रपटाचे लेखन गणेश पंडित यांनी केले असून वेगवगेळे विषय हाताळण्यात, काहीतरी नाविन्यपूर्ण देण्यात गणेश पंडित यांचा हातखंडा आहे. त्यामुळे या चित्रपटातही काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार हे नक्की. ७ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive