By  
on  

Birthday Special: सोनाली बेंद्रेच्या या खुलाशाचा चाहत्यांना बसला होता धक्का

लोभस चेह-याची अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा आज वाढदिवस आहे.  वयाच्या १९ व्या वर्षी अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केलेल्या सोनालीने आजवर अनेक यशस्वी सिनेमे दिले आहेत. दिलजले सिनेमातून सोनलीला यशाची चव चाखायला मिळाली. गोल्डी बहलशी लग्न केल्यानंतर आणि मुलाच्या जन्मानंतर तिने सिनेमातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर एका शोची जज बनून तिने पुनरागमन केलं होतं. याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडली. फिटनेसच्या बाबत कायम सजग असलेल्या सोनालीला हायग्रेड कॅन्सरचं निदान झालं. 

 

 

या बातमीमुळे सगळ्या बॉलिवूडला धक्का बसला होता. सोनालीच्या कुटुंबियांसाठी देखील हा मोठा धक्का होता. कॅन्सरचं निदान झाल्यावरची रात्र सोनालीसाठी अत्यंत कठीण असल्याचं तिने सांगितलं आहे. याबाबत सोनाली म्हणते, ती रात्र माझ्यासाठी अतिशय वाईट होतं. माझ्या आजाराचं निदान कॅन्सर आहे हे समजल्यावर मी रात्रभर झोपू शकले नव्हते.’ पण सोनालीने परिस्थितीसमोर न हारता 2 हात करण्याचं ठरवलं. 

 

वर्षभर न्युयॉर्कमध्ये उपचार घेतल्यानंतर ती भारतात परतली. आता ती बरी असून अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असते. सोनालीला पीपिंगमून मराठीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा...

Recommended

PeepingMoon Exclusive