By  
on  

चिन्मय उदगीरकरच्या डोक्याला 6 टाके, ‘मेकअप’च्या सेटवर झाली दुखापत

 मराठी टेलिव्हीजवरील लाडका चेहरा चिन्मय उदगीरकर मेकअप या सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसेल. या सिनेमाचं मुख्य आकर्षण म्हणजे सैराटमधील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुही या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रिंकू आणि चिन्मय अशी वेगळी जोडी पडद्यावर पाहायला मिळेल. 
मात्र याच सिनेमाच्या सेटवर असं काही घडलंय ज्याची सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या सिनेमाच्या सेटवर असा काही अपघात घडला की ज्याने दोन कलाकारांना दुखापत झाली.

पुण्यातील हडपसर येथे सिनेमाचं चित्रीकरण सुरु होते. सिनेमाचा मोंटाज शूट केल्यानंतर तो पाहण्यासाठी सिनेमातील कलाकार चिन्मय मॉनिटर जवळ गेला. यावेळी एका भिंतीला टेकून चिन्मय उभा होता. त्याचवेळी अचानक भिंत कोसळून चिन्मय आणि सिनेमाचे दिग्दर्शक-लेखक गणेश पंडीत यांच्यावर कोसळली. या अपघातात गणेश पंडीत यांना दुखापत झाली. मात्र चिन्मयच्याही डोक्यावर भिंत कोसळली असल्याने त्यालाही मोठी दुखापत झाली. मात्र नंतर डोक्यातून रक्त येऊ लागल्याने त्याच्या हे काही वेळाने लक्षात आले. दवाखान्यात नेले असता चिन्मयच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पिपींगमून मराठीशी बोलताना चिन्मयने त्याला 6 टाके पडले असल्याची माहिती दिली आहे. 


या अपघाताला तब्बल 4 महिने झाले असून आता मेकअप हा सिनेमा रिलीजच्या वाटेवर आहे. 7 फेब्रुवारी 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होईल. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive