सिनेमागृहात ‘तानाजी’वर नोटांचा पाऊस 

By  
on  

सध्या महाराष्ट्राला वेड लावलय ते ‘तानाजी’ या चित्रपटाने. अभिनेता अजय देवगण याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तानाजी’ हा चित्रपट सध्या धुमाकुळ घालतोय. त्यातच कोल्हापुरातील एका चित्रपटगृहात जे झालं ते पाहुन या चित्रपटाची सध्याची क्रेझ नक्कीच लक्षात येईल.

कोल्हापुरातील पद्मा टॉकिजमध्ये  तानाजी चित्रपट प्रेक्षक पाहत होते. त्यातच चित्रपटातील तानाजी म्हणजेच त्यात भूमिका साकारणाऱ्या अजय देवगणची एन्ट्री पडद्यावर झाली. अजयला मोठ्या पडद्यावर तानाजीच्या रुपात पाहुन प्रेक्षकांना आनंद अनावर झाला आणि त्यांनी शिट्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या तर काहींनी चक्क पैसे उधळले. आणि अशाप्रकारे अजयच्या एन्ट्रीवर नोटांचा पाऊस झाला. कोल्हापुरच्या चित्रपटगृहातील हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

अजय देवगणचा मोठा प्रेक्षकवर्ग तर आहेच मात्र वीर योद्धा तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा इतिहास रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करताना दिसत आहेत.

दिवसेंदिवस हा चित्रपट कमाईचा उच्चांक गाठताना दिसत आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने 107.68 कोटी इतकी कमाई केली असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची चांगलीच घौडदौड सुरु आहे.
 

Recommended

Loading...
Share