जेव्हा अमृता आणि सोनाली या दोघींमध्ये रंगतो दुरंगी सामना

By  
on  

‘चोरीचा मामला’ या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या प्रमोशन करताना दिसत आहे. या सिनेमात अमृताची श्रद्धा या नावाची मनोरंजक भूमिका पाहायला मिळेल. याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी अमृता आणि टीम पोहोचली युवा डान्सिंग क्विन रिएलिटी शोच्या मंचावर. 

यावेळी कधी न पाहिलेलं असं दृश्य पाहायला मिळालं. एकीकडे नटरंग सिनेमातील वाजले की बारा फेम अशी ओळख असलेली अभिनेत्री अमृता खानविलकर तर दुसरीक़डे अप्सरा आली फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी एकाच मंचावर पाहायला मिळाल्या. एवढच नाही तर डान्सिंग क्विनच्या टीमने या दोघींना एक टास्कही दिला. आणि दोघींमध्ये रंगला दुरंगी सामना.

या टास्कमध्ये दोघी एकाच मंचावर पाठमोऱ्या बसल्या होत्या. यावेळी दोघींमध्ये जास्त कोण रागीट आहे असे विचारल्यावर अमृताने स्वत:चं आणि सोनालीने अमृताचं नाव घेतलं. तर सगळ्यात जास्त गॉसिप कोण करतं या प्रश्नावरही अमृताने स्वत:चं आणि सोनालीने अमृताचं नाव घेतलं. शिवाय जर भांडण झालं तर पहिले कोण सॉरी म्हणेल, या प्रश्नावरही अमृताने स्वत:चे आणि सोनालीने अमृताचे नाव घेतले.

तर या दोघींनाही एकत्र पाहुन “हाच तो महाराष्ट्राला बघायचा असलेला क्षण” असं हेमंत ढोमे गंमतीत म्हटला. एकूणच हा दुरंगी सामना अत्यंत रंजक ठरला. ‘चोरीचा मामला’ सिनेमाच्या टीमने या मंचावर यावेळी चांगलीच धमाल केली शिवाय.

Recommended

Loading...
Share