आणि या कलाकरांच्या सिनेमाचा ट्रेलरच चक्क चोरीला गेला

By  
on  

तुम्ही कधी सिनेमाचा ट्रेलर चोरीला गेल्याची बातमी वाचली किंवा पाहिली आहे का ? नसेल वाचली तर आता वाचा, कारण असं घडलय एका मराठी सिनेमाच्या बाबतीत. 'चोरीचा मामला' या आगामी सिनेमाचा ट्रेलर चोरीला गेल्याची बातमी समोर आली आहे. याविषयीची माहिती देणारे दुसरे तिसरे कुणी नसून स्वत: सिनेमातील कलाकारच याविषयी सांगत आहेत. या सिनेमातील अभिनेता हेमंत ढोमेने फेसबुकवर चक्क लाईव्ह व्हिडीओ करुन याविषयीची माहिती दिली

तर या सिनेमातील अभिनेत्री अमृता खानविलकरनेही याविषयी पोस्ट करुन माहिती दिली की, “आमचा ट्रेलर सापडला तर परत पाठवा”   

तर सिनेमाचे लेखक दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवने चक्क ट्रेलर शोधून काढण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली. तसा व्हिडीओही तयार केला मात्र आसपास कुढेच व्हिडीओत पोलिस किंवा पोलिस स्टेशनही दिसले नाही. 

एकूणच या सिनेमाची संपूर्ण टीम चोरीला गेलेल्या ट्रेलरच्या शोधात आहेत. सोशल मिडीयावर या चोरीची जोरदार चर्चा आहे. 'चोरीचा मामला' या सिनेमाच्या प्रमोशनची ही अनोखी रणनीती असल्याचं बोललं जातय. लवकरच सिनेमाचा ट्रेलर रिलीज होत असल्याने हटके पद्धतिनं त्याचं प्रमोशन करण्याची ही युक्ती सिनेमाच्या टीमने सुचवली असल्याचीही चर्चा आहे. 
 

Recommended

Loading...
Share