असा आहे ‘झुंड’चा टीजर, अभिषेक बच्चननेही केलं कौतुक

By  
on  

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' सिनेमाची बऱ्याच कालावधी पासून चर्चा आहे. त्याच कारण म्हणजे नागराज मंजुळे यांचा पहिला हिंदी सिनेमा आणि बिग बीं अमिताभ बच्चन यांची यात भूमिका. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लुक पोस्टर रिलीज केल्यानंतर या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आला आहे.

 

हा टीजर स्वत: बिग बींचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनने सोशल मिडीयावर रिलीज केला आहे. हा टीझर पाहून अभिषेक बच्चनने टीजर छान असल्याचे म्हणत कौतुक केलं आहे. 

बिग बींची या सिनेमात मुख्य भूमिका असून नागराज मंजळे यांचं दिग्दर्शन आहे. या सिनेमाचा अजय-अतुल यांनी संगीत दिल्याने सिनेमातील संगीताचीही उत्सुकता आहे.

20 सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होणार असल्याचं बोललं जातय. 
 

Recommended

Loading...
Share