By  
on  

पाहा Video : रोहित राऊतने दिशा पटाणीला असं केलं प्रपोज

मराठीतील तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊत हा  सध्या ‘इंडियन आयडल पर्व ११’ या हिंदी रिएलिटी शोचा स्पर्धक आहे. तरुणींचा ह्या लाडक्या गायकाचा मात्र एका अभिनेत्रीसाठी नादच खुळा झालाय. बॉलिवूडच्या सुपरहॉट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या दिशा पाटणीला रोहितने चक्क सर्वांसमोरच प्रपोज केलं आणि उपस्थित असलेले सर्व कलाकार आणि रसिक अवाक् झाले. 

 इंडियन आयडल पर्व ११मध्ये ‘मलंग’चे प्रमोशन करण्यासाठी अभिनेत्री दिशा पटाणी आणि आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर  पोहोचले होते. दरम्यान सर्वच स्पर्धकांमध्ये दिशाला इम्प्रेस करण्यासाठी चढाओढ लागली होती.  पण रोहित राऊतने थेट जाऊन दिशाला डान्स करणार का असं म्हणत प्रपोज केलं. दिशा रोहितच्या बोलण्याने आकर्षित झाली आणि क्षणार्धात डान्स करायला होकार दिला.   

मोहित सूरी दिग्दर्शित ‘मलंग’ येत्या 7 फेब्रुवारी रोजी सिनेरसिकांच्या भेटीला येत आहे. हा एक रोमॅंण्टीक थ्रिलर सिनेमा असल्याने सिनेमाबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive