By  
on  

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना ‘पद्मश्री’ जाहीर

भावगीतांसह मराठी आणि हिंदी सिनेमांमधील गाण्यांना सुरेल आवाज देणार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. देशातील अत्यंत मानाचा मानला जाणारा हा पुरस्कार वाडकर यांना घोषीत झाला आहे. सुरेश वाडकर यांच्यावर आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या संगीतसेवेसाठी विविध पुरस्कारांचा वर्षाव झालाय. आणि आता यात आणखी एका मोठ्या पुरस्काराचा समावेश होत आहे. ‘मेघा रे मेघा रे’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’, ‘ए जिंदगी’ ही आणि त्यांची इतर बरीच गाणी प्रचंड गाजली आहेत. मराठी आणि हिंदींतील अनेक सिनेमासाठी त्यांनी पार्श्वगायन केलं आहे. शिवाय भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी, आणि उर्दू भाषेतूनही त्यांनी गाणी गायली आहेत.

त्यांच्या संगीत विद्यालयाच्या माध्यमातून ते अनेकांना संगीताचं प्रशिक्षण देतात. आजीवासन म्युझिक अकॅडमी असं या संगीत विद्यालयाचं नाव आहे. 2007मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.. तर 2011मध्ये ‘मी सिंधूताई सपकाळ’ या सिनेमातील ‘हे भास्करा क्षीतीजावरी या’ या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 
 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive