अलिकडेच प्रदर्शित झालेल्या सुपरहिट हिरकणीचं गाणं 'जगणं हे न्यारं झालं जी'ची गायिका मधुरा कुंभार नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे. शास्त्रीय संगीतापासून ते सुगम संगीतापर्यंत सर्वांमध्येच लिलया संचार करणारा तरुणाईच्या लाडक्या प्रसाद पाध्येसह मधुराने लग्नगाठ बांधली.
मधुराची मैत्रिण आणि पार्श्वगायिका जुईली जोगळेकरने हे लग्नसोहळ्याचे फोटो आपल्या सोशळ मिडीया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
मधुरा आणि प्रसाद यांचा कोकणात देवगड हे विवाहसोहळा पार पडला. अत्यंत साधेपणाने आणि नातेवाईक व जवळच्या मित्रपरिवारासह हा सोहळा पार पडला.
‘बालगंधर्व’ सिनेमामुळे प्रसादला खरी ओळख मिळाली. मधुरासुध्दा पार्श्वगायनासोबतच एक उत्तम परफॉर्मरसुध्दा आहे.