By  
on  

देवदत्तच्या आयुष्यात ‘देवा’ नावाचा असा आहे योगायोग

‘जय मल्हार’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला देवदत्त उर्फ ‘देवा’ आता डॉन बनलाय. अभिनेता देवदत्त नागेची डॉक्टर डॉन ही नवी मालिका येत आहे. या मालिकेत अभिनेत्री श्वेता शिंदे देवदत्तसोबत झळकणार आहे. शिवाय ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचीही विनोदी आणि महत्त्वाची भूमिका आहे. 


नुकताच या मालिकेचा लाँच सोहळा ‘जलेश क्रुझ’वर रंगला. यावेळी मालिकेची कास्ट या मालिकेविषयी भरभरून बोलताना दिसली. त्यातच देवदत्तने पिपींगमून मराठीसोबत बोलत असताना त्याच्या देवा या नावासोबत असलेला योगायोग शेयर केला. देवदत्त म्हणतो की, “देवा हे नाव माझ्यासाठी नेहमीच सकारात्मक राहिलय. पहिली मालिका जी केली ती देवांची होती. त्यानंतर एका मालिकेत मला रोहिणी मॅमसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्या प्रोडक्शनचं नाव ‘देवस्व’ प्रोडक्शन होतं. त्यानंतर जी मालिका केली त्याचं नाव ‘देवयानी’ होतं. जय मल्हार मालिकेतही ‘देवा’ हेच नाव होतं. मी तान्हाजी सिनेमा केला त्याचं अजय देवगण प्रोडक्शन होतं. आणि मी स्वत: प्रचंड देवभोळा आहे. आणि डॉक्टर डॉन मालिकेत टीमने माझं नाव ‘देवा’ म्हणूनच ठेवलेलं आहे. 

 

पुढे याविषयी देवदत्त म्हणतो की, “देवाला आपण हृदयात ठेवतो आणि मलाही प्रत्येक जण हृदयात ठेवेल यात शंका नाही.” येत्या 12 फेब्रुवारीपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive