By  
on  

धक्कादायक! पुण्यात ज्वेलर्सच्या दुकानातून अंगठी चोरताना अभिनेत्री सीसीटीव्हीत कैद

एका ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याची अंगठी चोरताना एक अभिनेत्री सीसीटीव्हीत कैद झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. स्नेहलता पाटील असं या अभिनेत्रीचं नाव असून पुण्यातील कॅम्प भागातील एका प्रसिध्द मॉलमधील ज्वेलर्समध्ये सोनं  खरेदी करण्याच्या बहाण्याने गेली आणि तेथील दोन अंगठ्या तिने चोरल्या परंतु हा सर्व चोरीचा मामला सीसीटीव्हीत कैद झाला. 

या अंगठ्यांची किंमत जवळपास ५० हजार रुपये इतकी असल्याचं समजतंय.  पोलीस ठाण्यात या अभिनेत्रीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून सीसीटीव्हीच्या मदतीने तिला तात्काळ अटक करण्यात आली.

स्नेहलता पुण्यातील कोथरुड येथे राहणारी असून तिने तीन हिंदी सिनेमांमध्ये काम केल्याचे बोलले जात आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive