By  
on  

पाहा Photos : बोनसचा शानदार ट्रेलर लॉंच सोहळा

‘बोनस’चा ट्रेलर नुकताच शानदार सोहळ्यात प्रदर्शित झाला. यावेळी सिनेमातले कलाकार गश्मीर महाजनी, पूजा सावंत, मोहन आगाशे आणि जयवंत वाडकर, दिग्दर्शक सौरभ भावे आणि प्रस्तुतकर्ता तसेच निर्माते हजर होते.

या चित्रपटाची कथा एका सुखवस्तू कुटुंबातील युवकाभोवती फिरते. तो एका सर्वसामान्य मजुराप्रमाणे एक महिना आयुष्य व्यतीत करण्याचे आपल्या आजोबांचे आव्हान स्वीकारतो आणि त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. या युवकाने त्याच्या आजोबांच्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याच्या निर्णयावर टीका केलेली असते, त्यातून हे आव्हान आजोबा त्याला देतात. आठ हजार रुपयांमध्ये महिना काढण्याचे आव्हान तो स्वीकारतो. तो एका कोळीवाड्यात ८० चौरस फुटांच्या झोपडीत राहतो. त्यादरम्यान त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्या जीवनशैलीशी जुळवून घेणे कठीण होते.

‘छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख आहे,’ अशी टॅगलाईन त्याच्या या ट्रेलरवर अवतरते. त्यातून ही कथा पुढे सरकते आणि शेवटी एक सामाजिक संदेश देत संपते. त्या कोळीवाड्यातच तो त्याच्या प्रेयसीला भेटतो. तिची भूमिका पूजा सावंतने साकारली आहे. नायक आपले आव्हान पूर्ण करतो की त्यात त्याला हार मानवी लागते? हे सिनेमात पाहणं उत्कंठावर्धक ठरेल. 

या चित्रपटाची सध्या चर्चा आहे, ती विविध कारणांसाठी. या चित्रपटाची कथा तर अनोखी आहेच, पण पूजा सावंत आणि गश्मीर महाजनी ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली आहेत. हा सिनेमा अशा कोळीवाड्याच्या पार्श्वभूमीवर आकाराला येतो. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंत ‘बोनस’ चित्रपटात एक वेगळीच भूमिका साकारत आहे.

गश्मीर महाजनीने अगदी कमी वेळातच आपली अशी वेगळी छाप चित्रपटसृष्टीत निर्माण केली आहे. देऊळबंद, कान्हा, वन वे टीकेट आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही यातील त्याच्या भूमिकांसाठी त्याचे कौतुक झाले. तब्बल दोन वर्षांनी तो मराठी चित्रपटांमध्ये पुन्हा दिसणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात युवा दिग्दर्शक सौरभ भावे याने केले आहे. त्यांची ओळख एक प्रख्यात कथा आणि पटकथालेखक म्हणून चित्रपटसृष्टीत आहे. त्यांनी कित्येक मराठी चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून त्यांत हापूस, ताऱ्यांचे बेट, हृदयांतर, चुंबक आदी चित्रपटांचा समावेश आहे. 

येत्या 28 फेब्रुवारीला अर्जुन सिंग बरन व कार्तिक डी निशाणदार आणि ‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’ प्रस्तुत;बोनसची भेट रसिकांना सिनेमागृहात मिळणार आहे. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive