महाराष्ट्राला अनेक शूर सरदरांची परंपरा आहे. शिवरायांच्या स्वराज्य कार्यात अनेक सरदारांनी मोलाचं योगदान दिलं आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे हंबीरराव मोहिते. अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे सरदार हंबीरराव मोहिते यांच्या शौर्यगाथेवर सिनेमा घेऊन रसिकांसमोर येत आहे. आज शिवजयंतीनिमित्त त्यांनी या सिनेमाचा आणखी एक लुक नुकताच फेसबुकद्वारे उलगडला. येत्या जून 2020 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
या पोस्टरवरून सरसेनापती हंबीरराव यांच्या भूमिकेत प्रवीण तरडेच असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
प्रविण तरडे हा उलगडत म्हणतात, " जणू सह्याद्रीचा कडा , श्वास रोखुनी खडा...छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून सरसेनापती हंबीरराव तुमच्या समोर हजर ... भव्यदिव्य शिवपरंपरा तुमच्यासाठी लवकरच ... देवूळबंद आणि मुळशी पॅटर्न नंतर माझं लेखन दिग्दर्शन असलेला पुढचा ऐतिहासिक सिनेमा "