एकेकाळी दिग्गजांसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीची परिस्थिती पाहून तुम्हालाही वाईट वाटेल

By  
on  

80-90च्या दशकात अनेक मराठी सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यापैकीच एक सिनेमा म्हणजे धुमधडाका. या सिनेमात अशोक सराफ, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता जोशी, प्रेमाकिरण यांच्यासोबत आणखी एक अभिनेत्री होती ती म्हणजे सुरेखा उर्फ ऐश्वर्या राणे. 
धुमधडाका शिवाय शराबी, भटक भवानी या सिनेमातही काम केलं आहे.

 

 

सिनेमात काम मिळत असताना त्या आर्थिक सुस्थिततही होत्या. मुंबईत त्यांचं स्वत:च्या मालकीचं घर होतं. पण ‘मर्द’ सिनेमाच्या दरम्यान घोड्यावरून पड्ल्या. त्यामुळे त्यांच्या पाठीला दुखापत झाली. पाठीचे हाड मोडल्याने सिनेमात काम करणं अशक्य बनलं. त्या पुन्हा सावंतवाडीला निघून गेल्या. पण पेन्शनसाठी होते नव्हते ते पैसे खर्च करून मुंबईला आल्या. पण इथं त्यांच्या नशिबी भीक मागणं आलं.  उपचारात सर्व पैसा खर्च झाला. त्यानंतर घरच्यांनीही पाठ फिरवल्याने त्यांची परिस्थिती अधिकच वाईट बनली. सुरेखा या मंत्रालयात भीक मागून निर्वाह करत आहेत. संबंधित सरकारकडून अनेकदा त्यांना मदतीचं आश्वासन देण्यात आलं. पण कोणतीही मदत त्यांच्यापर्यंत पोहचू शकली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी सरकारची कलाकाराबाबतची अनास्था  दाखवली आहे. आता सुरेखा यांना सरकारकडून मदत मिळेल अशी आशा करायला हरकत नाही.

Recommended

Loading...
Share