By  
on  

राहुल देशपांडे अभिनीत ‘मी... वसंतराव’चा टिझर लॉंच उस्ताद झाकीर हुसेन यांच्या हस्ते

 सुरू होत आहे वसंतपर्व... पुन्हा एकदा मैफल रंगणार... मंत्रमुग्ध करणाऱ्या दैवी सुरांनी पुन्हा एकदा चित्रपटगृह मोहरणार... अवतरणार तो सुवर्णकाळ... वायाकॉम18 स्टुडीओज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत शास्त्रीय संगितातील सुरसाम्राट सन्माननीय वसंतराव देशपांडे यांचा विलक्षण प्रवास... वसंतराव देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने रसिकांवर भुरळ घातली… "कट्यार काळजात घुसली" "अष्टविनायक" ह्यातील अजरामर गाणी अजूनही प्रेक्षकांवर मोहिनी घालतात. अश्या "वसंतराव देशपांडे" ह्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट म्हणजे रसिक प्रेक्षकांना पर्वणीच.


‘मी... वसंतराव’ या चित्रपटाचा टिझर, पोस्टर अनावरण उस्ताद झाकीर हुसेन यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यास अजित अंधारे (सीओओ  वायाकॉम18 स्टुडीओज), निखिल साने (व्यवसाय प्रमुख - मराठी मनोरंजन, वायाकॉम18), राहुल देशपांडे, अनीता दाते, निपुण धर्माधिकारी, कौमुदी वलोकर, पुष्कराज चिरपुटकर उपस्थितीत होते. सोहळ्या दरम्यान उस्ताद झाकीर हुसेन यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला.

आजोबा वसंतराव देशपांडे यांच्या शास्त्रीय संगीताचा वारसा राहुल देशपांडे गेले अनेक वर्ष समर्थपणे पुढे नेत आहेत. आपल्या गायकीमधील नवनवीन गोष्टी तो प्रेक्षकांसमोर सादर करत आहे. आणि आता मी. वसंतराव या चित्रपटाद्वारे तो अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असून त्यांच्या आजोबांची म्हणजे वसंतरावांची भूमिका साकारणार हा दुग्धशर्करा योगच असे म्हणायला हरकत नाही.

वायाकोम18 स्टुडीओजने आजवर प्रेक्षकांसमोर दर्जेदार "आत्मचरित्रात्मक" चित्रपटांचं सादरीकरण करून एक उत्तुंग परंपरा राखली आहे, त्याच मालिकेतील आमचे पुढचे सुवर्ण पान म्हणजे "मी वसंतराव". हा चित्रपट रसिकांना एक नवी संगीत भेट ठरेल यात शंका नाही.

 
चित्रपटाचा विषय, त्यामधील तगडे कलाकार यामुळे चित्रपट प्रेक्षकांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे यात शंका नाही. चित्रपटामध्ये अनीता दाते, अमेय वाघ, कौमुदी वलोकर मुख्य भूमिकेत असणार आहेत तर निपुण धर्माधिकारी याने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे...    

वायाकॉम18 स्टुडीओज प्रस्तुत आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित मी वसंतराव’ १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive