By  
on  

Exclusive: प्रेक्षकांचा रसभंग होणार असल्याबाबत आलोक राजवाडे याने दिली ही प्रतिक्रिया

काही दिवसांपुर्वी ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या सिनेमातील सविता भाभी या कॉमिक व्यक्तिरेखावरुन वाद निर्माण झाला होता.  या व्यक्तिरेखेचा कॉपीराईट आपल्याकडे असल्याचं निलेश गुप्ता यांचं म्हणणं आहे. निलेश यांनी हे नाव बदलण्याची मागणी केली होती. पण येत्या 6 मार्चला हा सिनेमा रिलीज होणार असल्याने इतक्या कमी वेळात हा बदल शक्य नसल्याचं ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ च्या मेकर्सचं म्हणणं होतं.

 

 

यावर तोडगा निघाला आहे. या करारानुसार सिनेमातील सविता भाभी हा त्या जागी म्युट असेल. यावेळी पीपिंगमून मराठीशी बोलताना दिग्दर्शक आलोक राजवाडे म्हणतो, ‘ या सिनेमात सविताभाभी हा शब्द म्युट होणार असल्याने प्रेक्षकांचा रसभंग होणार आहे याची खंत वाटते. पण मी प्रेक्षकांना विनंती करेन की त्यांनी झालेला बदल समजून घ्यावा. होणा-या रसभंगाबाबत मी माफी मागतो.’ येत्या 6 मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive