By  
on  

आदर्श शिंदेचा यावर्षीचा वाढदिवस या कारणासाठी ठरणार खास

आपल्या दमदार आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आदर्श शिंदेचा ७ मार्चला म्हणजेच उद्या आहे वाढदिवस. आदर्शला त्याच्या वाढदिवसाचं एक हटके सरप्राईज मिळालं. स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम आदर्श जज करतोय. मी होणार सुपरस्टारच्या मंचावर आदर्शचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

या खास सेलिब्रेशनमध्ये मृणाल कुलकर्णी, राहुल देशपांडे आणि मी होणार सुपरस्टारची संपूर्ण टीम सामिल झाली होती. स्पर्धकांनी एक खास गिफ्ट देत आदर्शला सरप्राईज दिलं. या अनोख्या सरप्राईजने आदर्शही भारावून गेला होता. गेले कित्येक दिवस या सेलिब्रेशनची जय्यत तयारी सेटवर सुरु होती मात्र आदर्शला हे कोणी कळू दिलं नाही. एपिसोड अखेरिस केक पार्टी करत आदर्शला मी होणार सुपरस्टारच्या संपूर्ण टीमने शुभेच्छा दिल्या. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive