By  
on  

Video: ऐकावं ते नवलंच ! करोना व्हायरसवर आता आलं गाणं

करोना व्हायरसचा धसका संपूर्ण जगाने घेतला आहे. संपूर्ण मनोरंजनविश्वालासुध्दा  करोनाचा फटका बसला आहे. सर्वांनाच करोनापासून योग्य ती खबरदारी घेण्याचे सांगण्यात येत आहेत.  मराठी मालिकांच्या सेटवरही करोनाविरोधात पुरेपूर खबरदारी घेण्यात येत असल्याचं वृत्त आहे, तर बॉलिवूड सिनेमाचं अनेक परदेशी दौ-यांवर होणारे शूटींग शेड्यूल रद्द करण्यात येत आहेत. 

बॉलिवूडमधील काही सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखासुध्दा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात येणार असल्याचे कळत असतानाच आता सर्वच क्षेत्रांना करोनाचा फटका बसतोय. पण यात एकावे ते नवलच अशी एक गोष्ट समोर आलीय, ती म्हणजे चक्क करोना व्हायरसवर एक गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे.या गाण्याचे गायक आणि गीतकार हे रवी वाघमारे आहेत. विशेष म्हणजे या गाण्यात कोरोना व्हायरसविषयी जागृती करण्यात आली  असून त्याबाबतच्या अफवांना खत-पाणी न घालण्याचे आवाहनही गाण्यातून करण्यात येत आहे. ते फारच कौतुकास्पद आहे.  हे गाणं सध्या धुमाकूळ घालतंय, तुम्हीसुध्दा ते एकदा नक्कीच पाहा. 

इतकंच नव्हे तर या गाण्यावरील व्हिडीओवर वरातीत नाचतानाचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive