By  
on  

'लय भारी' फेम आदिती पोहनकरवर स्टाईलिस्टने केले हे गंभीर आरोप, सोशल मिडीयावर होतेय चर्चा

सिनेसृष्टीत कधी कोणाच्याबाबतीत काय घडेल याचा नेम नाही. ही दुनिया मायाजाल आहे. झगमगत्या चंदेरी दुनियेच्या पडद्यामागच्या कथा मात्र बहुतेकदा अगदी विरुध्द असतात. अशीच एक पडद्यामागची कहाणी काही पुराव्यांमळे प्रकाशझोतात आली आहे. 

रितेश देशमुखच्या लय भारी सिनेमामुळे  रसिकांसमोर आलेली अभिनेत्री आदिती पोहनकर आपल्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मिडीयावर आदिती नेहमीच अॅक्टिव्ह असते. तिची भूमिका असलेली नेटफिल्कसची इम्तियाज अली दिग्दर्शित शी ही वेबसिरीज नुकतीच रसिकांच्या भेटीला आली आहे.

आदिती पुन्हा प्रकाशझोतात आली आहे,पण या वेबसिरीजमुळे नाही तर चक्क एका होतकरु फॅशन स्टायलिस्टचे पैसे बुडवून व तिला तिच्या कामाचं क्रेडीट न देऊन.

बॉलिवूडकरांच्या फॅशनवर घारीसारखी नजर ठेवून असणारं आणि त्यांची असली पोल-खोल करणारं सुप्रसिध्द ‘डाएट सब्या’ हे इन्स्टाग्राम पेजसुध्दा पुजारिनी घोष या स्टाईलिस्टच्या मदतीला धावून आलं आहे. डाएट सब्याने इन्स्टाग्रामवरुन सर्वांना पुजारिनीला पाठींबा देण्याचं आवाहन केलं. त्यानंतर इंडस्ट्रीतून अनेक मान्यवरांनी होतकरु व कामाशी प्रामाणिक असलेल्या पुजारिनीला आपला पाठींबा दर्शवला आहे. 

काय आहे प्रकरण? 

पुजारिनी घोष या फॅशन स्टाईलिस्टने अभिनेत्री आदिती पोहनकरसोबत व एका फोटोग्राफरसह काही दिवसांपूर्वी तिचे काही शूट्स केले. जे आदितीच्या नेटफिल्क्सच्या प्रोजेक्टसाठी वापरण्यात येणार होते. अनेक दिवस झाल्यानंतर पुजारिनीने आदितीला फोटो शूटचा वापर झाला आहे का अशी विचारणा केली. परंतु त्यावर ते शूट वाया गेलं असून त्याचा काही उपयोगच होणार नाही म्हणून तिला उडवून लावलं. तसंच तुझ्या कामामुळे आमची एनर्जी व वेळ वाया गेला असाही टोला आदितीने तिला लगावला. त्यानंतर थोडा काळ गेला फोटोग्राफर व आदितीकडे फोटोंबाबत विचारणा करणं पुजारिनीने सोडून दिलं होतं. पण नंतर तिला एक आश्चर्याचा धक्काच बसला. २५ मार्चला नेटफ्लिक्सच्या पेजवर पुजारिनीने स्टाईल केलेले आदितीचे फोटो झळकले होते. पण तिथे तिला कुठलंही क्रेडिट  देण्यात आलं नाही. व कामाचा मोबदलाही तिला नाकारण्यात आला होता. त्यानंतर सारखी विचारणा करते म्हणून आदिती व त्या फोटोग्राफरने पुजारिनीला सर्वच सोशल मिडीया साईट्स व फोनवरुन ब्लॉक करुन टाकलं. 

मग फॅशन स्टाईलिस्ट पुजारिनी घोषने झालेल्या सर्व प्रकारासह व पुराव्यानिशी डाएट सब्याकडे मदत मागितली. फोटोग्राफर व आदितीसोबतच्या संभाषणाचे काही व्हॉट्सअप शॉट्सपण दिले.  डाएट सब्याने मग घडला प्रकार आपल्या इन्स्टाग्राम स्टोरींवरुन सर्वांसमोर आणला. त्यावर अनेकांनी पुजारिनीला न्याय मिळायलाच हवा तिच्या कामाचं क्रेडिट तिला मिळणं गजेचं आहे. 

एकूणच आता या प्रकारानंतर आदिती नेमकी काय प्रतिक्रीया देते हे, पाहणं औत्सुक्याचं आहे. पण  अशाप्रकारचा हा पहिलाच प्रकार नाही. अनेक प्रकरणं यापूर्वी घडली आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळीसोबतसुध्दा मागच्या वर्षी असाच एक प्रकार घडला होता.
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive