आता देशात तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधानांनी जाहीर केला आहे. घरात बसणं कितीही कंटाळवाणं वाटत असलं तरी एक सुजाण नागरिक म्हणून त्या नियमांचं पालन करणं व स्वत:ची, कुटुंबियांची या करोनाच्या प्रादुर्भावापासून काळजी घेणं आपली जबाबदारी आहे.
या लॉकडाऊनच्या काळात सेलिब्रिटी आपला क्वारंटाईन काळ नानाविविध प्रकारे व्यतीत करत आहेत. कोणी पुस्तक वाचतोय तर कोणी गाणं शिकतोय. पण जर तुम्ही दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा हा व्हिडीओ पाहिलात तर तुम्हाल नक्कीच हसू येईल आणि मुलांच्या आनंदात आपला आनंद असतो हे पटेल.
सतीश राजवाडे यांचा चक्क लेकीसोबत भातुकलीचा मस्त खेळ रंगला आहे. चिनी मातीची छानशी खेळणी आणि त्यातला खोट्या खोट्या स्वयंपाकासोबत चहाचा आस्वाद घेताना ते पाहायला मिळतायत.
हा खुपच अनोखा व गोड असा व्हिडीओ या क्वारंटाईन काळात पाहायला मिळाला.