सध्या क्वारंटाईन काळात तब्बल २१ दिवस प्रत्येकाला घरीच राहून सुरक्षित राहायचं आहे. या काळात कोणीही घराबाहेर पडणार नाही अशी सरकारने सक्त ताकीद दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.करोनाला हरविण्यासाठी आपण सर्वांनी घरी थांबूनच ह्या संकटाला लवकरात लवकर परतवून लावायचं आहे. सर्व सरकारी यंत्रणा युध्द पातळीवर ह्या अस्मानी संकटाशी लढतायत.
दरम्यान, अत्यावश्यक वस्तूंसाठी म्हणजेच भाजीपाला आणण्यासाठी लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच अभिनेता मिलिंद सोमण बाजारात आला आणि समोरचं दृष्य बघून तो आश्चर्यचकितच झाला. मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत ‘काल बाजारात जाण्यासाठी पहिल्यांदाच घरातून बाहेर पडलो. रस्त्यावर एकही गाडी नाही, लोकांनी मास्क घातले आहेत. सगळीकडे शांतता होती’ असे कॅप्शन दिले आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच, मिलिंद आणि त्याची पत्नी अंकिताचे वर्कआऊट करताने व्हिडीओ व्हायरल झाले होते. अंकीताला पाठीवर घेऊन पुशअप्स करणा-या मिलिंदला पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले.