पाहा Video : पाठकबाई मिस करतायत 'तुझ्यात जीव रंगला'च्या सेटवरची ही धम्माल

By  
on  

करोनाने देशभर धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात कोणालाही घराबाहेर पडण्यास मनाई आहे. फक्त अत्यावश्यक सेवा व वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरु आहे. म्हणूनच नागरिकांना घरात राहा, सुरक्षित राहा असं आवाहन करण्यात आलं आहे. आज प्रत्येक जण आपल्या घरात कैद आहे. 

सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत. याचा फटका मनोरंजन विश्वालाही बसतोय. सर्व मालिका, सिनेमे यांचं शूटींग बंद करण्यात आलं आहे, त्यामुळे स्वाभाविकच सर्व कलाकार आपापल्या घरी कुटुंबियांसोबत हा वेळ घालवत आहेत. कितीही वेळ आराम केल किंवा रमवलं  तरी आपलं रोजचं जे रुटीन होतं त्याची नाही म्हणायला आठवण सतावतेच व पुन्हा आपण कधी त्यात परतणार ह्याचे वेध लागतात. 

सर्वांच्या लाडक्या आणि राणादाच्या सौभाग्यवती पाठकबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधरसुध्दा घरीच क्वारंटाईन वेळ घालवतेय. पण तिलासुध्दा आता रुटीनची आठवण येतेय.अक्षयाला ‘तुझ्यात जीव रंगला’च्या सेटवरची धम्माल-मस्तीची, संपूर्ण टीमची खुप आठवण येतेय. म्हणूनच तिने सेटवरचा एक जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे. यात अक्षया व अभिनेता राज हंचले ह्या दोघांनी ‘गजर हरिनामचा..’ या भजनावर ताल धरला आहे. सेटवरच्या सर्वांनीच दोघांना टाळ्यांच्या गजरात भरभरुन प्रतिसाद दिल्याचं यात पाहायला मिळतंय. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Missing this fun! Miss you all teamTJR!

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr) on

करोनाचं हे संकट लवकरच टळू दे व आपण सर्व पुन्हा आपापल्या रुटीनमध्ये परतू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अक्षया तु सुध्दा थोडा संयम ठेव लवकरच तुलाही तुझ्या संपूर्ण ‘तुझ्यात जीव रंगला’च्या टीमला भेटायला मिळेल ही सदिच्छा !
 

Recommended

Loading...
Share