अभिनेत्री स्पृहा जोशी लॉकडाऊनच्या या २१ दिवसांत तिला कृतज्ञ वाटणा-या गोष्टींबद्दल सांगत असते.आज तिने ज्याबद्दल सांगितलं. तो म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता जिव्हाळ्याचा विषय म्हणजे हॉलिडे. तिला आणि तिच्या पतीला केरळला फिरायला फार आवडतं. आज तिने तिच्या केरळ हॉलिडेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसंच या लॉकडाऊन काळात घरात कोंडून बसल्यावर ख-या अर्थानेहॉलिडेचं महत्त्व समजतंय असंही तिने स्पष्ट सांगितलं आहे.
स्पृहा पोस्टमध्ये म्हणते,"या घरी कोंडून बसण्याच्या काळात holiday चं महत्त्व खूप जास्त जाणवतंय. युरोपातली शहरं मी फिरले आहे. आणि आत्ता त्यांची जी परिस्थिती झाली आहे, त्यामुळे काळजाचं पाणी पाणी होतंय. इतक्यात परत तिथे कधी जाता येईल कुणास ठाऊक. एकुणातच बाहेर कुठेही प्रवासाला कधी जाता येईल कोण जाणे. पण सुट्टीची आठवण निघालीच आहे, तर दोन-तीन वर्षांपूर्वी मी आणि वरदने केलेली केरळची ट्रिप. आम्हाला दोघानांही केरळ खूप आवडतं. अगदी हनिमूनलाही आम्ही केरळला गेलो होतो. केरळचं वातावरण, जेवण, निसर्ग, माणसं या सगळ्याला एक विलक्षण रंगीबेरंगी जिवंतपणा आहे. एकाच वेळी कोलाहल आणि शांतता पोटात घेऊन जगणारी ही लोकं आणि शहर आहे. त्यामुळे ती केरळची चारच दिवसांची सुट्टी माझ्या मनात घर करून गेली. That's the holiday I'm grateful for. "
खरंय.. रोजच्या दैनंदिन आयुष्याला कंटाळल्यावर थोडं रिफ्रेश होण्यासाठी हॉलिडे आपल्या आयुष्यात महत्त्वाचा घटक ठरतो.