संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं व करोनाचा प्रादुर्भाव रोखावा. सरकारी यंत्रणांवरचा ताण कमी करावा. देशभरात पंतप्रधान मोदींनी तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.
आज सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. तर कोणी जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.प्रत्येकजण आपापल्या पध्दतीने मन रमवण्याचा, स्वत:ला छंदात गुंतवून घेण्याचा प्रयत्न करतोय.
मल्टिस्टारर धुरळा सिनेमा फेम दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी नुकतंच ट्विटरवरुन गाणं गात असल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ते म्हणतात, “माझं अत्यंत लाडकं गाणं! गायचा हौशी प्रयत्न. घरातच रहा.. गाणी ऐका.. गाणी गा.. वाचा.. पहा.. सकारात्मक रहा”
माझं अत्यंत लाडकं गाणं! गायचा हौशी प्रयत्न. घरातच रहा.. गाणी ऐका.. गाणी गा.. वाचा.. पहा.. सकारात्मक रहा! #gocoronago pic.twitter.com/SlCMMQrME6
— Sameer Vidwans (@sameervidwans) April 6, 2020
दिग्दर्शक समीर विद्वांस यांचं म्हणणं अगदी तंतोतंत खरं आहे. आपण सकारात्मक राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे. तरच आपल्या आजूबाजूचं वातावरणसुध्दा सकारात्मक होईल व लवकरच आपण धैर्याने आणि नेटाने हे करोनारुपी संकट परतवून लावू.
समीर यांनी यापूर्वी एक मार्मिक कविता सोशल मिडीयाच्या माध्यमातून केली होती. ज्याचं हातावर पोट आहे त्यांचं काय....त्यांचा धंदाच नाही होणार तर ते खाणार काय..जगणार कसे. याच धगधगत्या वास्तवावर आधारित ‘तूझं बाबा बरंय...’ ही कविता त्यांनी केली होती.