By  
on  

देशाला करोनामुक्त करण्यासाठी अलका कुबल याचं काळूबाईला साकडं, पाहा Video

संपूर्ण देशभरातच नाही तर महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं व करोनाचा प्रादुर्भाव रोखावा. सरकारी यंत्रणांवरचा ताण कमी करावा. देशभरात पंतप्रधान मोदींनी तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात प्रत्येकाने विशेष काळजी घेणं, अत्यावश्यक ठरतंय. 

अवघ्या जगावर ओढवलेल्या या करोना संकटाचं निवारण करण्यासाठी चैत्र नवरात्रीनिमित्त अभिनेत्री अलका कुबल यांनी मांढरदेवच्या काळूबाईला चैत्र नवरात्रीनिमित्त साकडं घातलं आहे. हे संकट लवकर टळू दे, मी स्वत: येऊन देवी तुझी खणा-नारळाने ओटी भरेन असं त्यांनी साकडं घातलं. नवसाला पावणारी काळूबाई त्यांचं हे गा-हाणं नक्की ऐकेल, अशी चाहत्यांना श्रध्दा आहे. देवीचा आर्शिर्वाद मनुष्याच्या पाठीशी भक्कम राहावा व मनुष्यजातीचं देवीने रक्षण करावं यासाठी अलकाताईंनी हा नवस केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Repost @sonymarathi with @make_repost ・・・ अलका कुबल-आठल्ये ह्यांनी सर्वांना विषाणूच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी घातलंय नवसाला पावणाऱ्या मांढरदेवीच्या आई काळुबाईकडे साकडं! नवी मालिका 'आई माझी काळुबाई' लवकरच फक्त सोनी मराठी वाहिनीवर. कुटुंबासह पाहा, नॉनस्टॉप मनोरंजन! #NonStopManoranjan #आईमाझीकाळुबाई । #AaiMaziKalubai #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati

A post shared by Alka Kubal Athalye (@alkakubal_23) on

 

नवस करतानाच अलकाताईंनी जगभर विज्ञान-तंत्रज्ञानाकडून या करोनारुपी राक्षसाचा खात्मा करण्यासाठी प्रयत्न  केले जात आहेत, याचा आवर्जून उल्लेख केला. पण जोडीला श्रध्दा हवीच. एकूणच सर्वांना यश मिळो व परिस्थिती लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive