By  
on  

सोनाली बेंद्रे म्हणते, 'मागील दोन वर्ष माझ्यासाठी Quarantine प्रमाणेच होते'

करोना संकटाशी आज जगासह आपला देशही झुंज देत आहे. आपले राज्यसरकार हे संकट परतवून लावण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहे. दररोज करोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ ही लक्षणीय आहे. म्हणूनच हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व ही साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने आहे तिथेच म्हणजेच घरातच राहायचंय आणि करोनाचा प्रादुर्भाव रोखायचा आहे. म्हणूनच पंतप्रधानांनी देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाऊन काळ जाहीर केला आहे.

यादरम्यान सर्वच आपापल्या घरात आहेत. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकालाच घरात राहण्यावाचून आता पर्याय उरलेला नाही. बॉलिवूडची सुंदर व गुणी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने नुकतंच आपल्या लॉकडाऊन काळ कसा व्यतीत करतेय याचा खुलासा केला. सोनाली म्हणते,  “गेली दोन वर्ष माझ्यासाठी क्वारंटाइनप्रमाणेच होती. त्यामुळे हा कालावधीही मला त्याचा सारखाच वाटतोय. त्याची मला सवय झाली होती.,” असं मत तिनं व्यक्त केलं आहे. २०१८ मध्ये सोनाली बेंद्रे हिला कर्करोगाचं निदान झालं होतं. न्यूयॉर्कमध्ये ती उपचारासाठी पती गोल्डी बहल यांच्यासोबत राहत होती. घरापासून, मुलापासून व कुटुंबियांपासून दूर ती न्यूयॉर्कमध्ये होती. काही महिन्यांपूर्वीच सोनाली उपचार घेऊन भारतात परतली आहे. 

स्पॉट बॉय या इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सोनालीने हे सर्व स्पष्ट केलं. ती पुढे सांगते," मी आजारपणामुळे तेव्हा जशी क्वारंटाईन होते तसंच फिलींग मला आता येत आहे, फरक इतकाच की तेव्हा मला माझे सर्व जवळचे मित्र-मैत्रिणी, आप्तेष्ट भेटायला येत असत. पण आता परिस्तिती खुप वेगळी असल्याने हे शक्य नाही. पण मी त्यांना मिस करतेय तसंच आणखी एक महत्त्वाचं म्हणजे, सध्या लॉकडाउनमुळे मला माझ्या आई-वडिलांचीही भेट घेता येत नाही. त्यामुळे मला त्यांचीही आठवण सतावते आहे,”

मागील दोन वर्षात आपल्या या आजाराबाबतची प्रत्येक अपडेट सोशल अकाऊंटच्या माध्यमातून सोनाली बेंद्रे चाहत्यांपर्यंत पोहचवत होती. तिच्या प्रत्येक अपडेटमधून ती या गंभीर प्रसंगाला किती धैर्याने सामोरे जाते, हे दिसून आलं आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive