लॉकडाऊन सुरु झाल्याने आयुष्याने एक वेगळंच वळण घेतलं. त्यादरम्यान असलेल्या तक्रारी आणि अनागोंदीच्या वातावरणात माझ्यासारखे काहीजण म्हणजेच लेखक, स्वप्न पाहणारे, जे आपल्याला आवडतं त्या गोष्टीतून समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत होते. दररोज वेब सिरीज, चित्रपट पाहत असताना लेखक आणि कॉन्टेन्ट क्रिएटर म्हणून प्रेरणा मिळत होतीच. त्याच वेळी रामचंद्र गांवकर यांनी या नवेपणात अजून काहीतरी भर घालण्याचा विचार केला आणि एका ऑनलाईन लघुकथा लेखन स्पर्धेची कल्पना सुचली. ...आणि कटिंग कहानी चा प्रवास सुरु झाला. एकमेव महत्त्वाचा नियम म्हणजे आमच्या ‘कटिंग चाय’ प्रमाणेच कथा लहान आणि रंजक असाव्यात हा मुख्य हेतू आगाज प्रोडक्शन्सची , प्रणव गंधे, आकाश शिंदे, युगांत पाटील, सानिका सुळे, शांतनु, शुभम ही उत्साही टीम सज्ज झाली आणि सर्व वेळापत्रकं, व्हिज्युअल जाहिराती आणि निकषांसह ‘कटिंग कहानी- एक ऑनलाइन लघुकथा लेखन स्पर्धा’ तयार झाली.
रोहन मापुस्कर ह्या उपक्रमाशी जोडले गेले आणि रोहन मापुस्कर कास्टिंग हे नाव कटिंग कहाणी सोबत जोडलं गेलं. त्यामुळे स्पर्धा जसजशी पुढे गेली तसतसे दररोज अधिकाधिक स्पर्धक सहभागी होत गेले. शेवटच्या दिवशी, देशभरातून, वेगवेगळ्या भाषा आणि शैलींमध्ये एकूण 511 गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचल्या होत्या. रोहन मापुस्कर यांचे आम्हाला मिळालेल्या सहकार्याचे हे निश्चितच एक अतिशय सकारात्मक प्रतिबिंब होते. 511 कथा वाचून आणि ऐकून घेण्याच्या प्रतीक्षेत होत्या, ती भावना वेगळीच होती. प्रवेश प्रक्रियेनंतर निकाल प्रक्रिया सुरू झाली. निकाल प्रक्रिया सुरु असताना लेखकांना प्रेरित ठेवण्यासाठी आम्ही अजून एक कल्पना घेऊन आलो, ती म्हणजे ‘ कहानी की कहानी ’. खासकरुन लेखकांसाठी आणि तेही दिग्गज लेखकांकडून घेतलेला एक मास्टरक्लास. राजेश मापुस्कर (फेरारी की सवारी, व्हेंटिलेटर चे दिग्दर्शक ), विजय मौर्य (गल्ली बॉयसाठी संवाद लेखक), सतीश आळेकर ( थिएटर आणि फिल्म्स मधील एक दिग्गज), आणि परेश मोकाशी (हरीशचंद्रची फॅक्टरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक, एलिझाबेथ एकादशी सारख्या समीक्षकांनी प्रशंसित केलेले चित्रपटांचे दिग्दर्शक ) यासारख्या लेखन क्षेत्रातील काही मोठ्या नावांनी ही सत्रे सादर केली.
TOP 10 लेखकांच्या टप्प्यावर शर्मन जोशी ह्यांच्या सारख्या प्रसिद्ध आणि लाडक्या कलाकाराची साथ व समर्थन मिळाले आगाज प्रोडक्शनला लाभले . टॉप 10 कथा आहेत, त्यांचे लेखक आणि त्यांचे सादरकर्ते असा प्रपंच आता आहे व तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी निर्मात्यांना उत्सुकता आहे.
अद्वैत दादरकर, संकेत तांडेल, आदित्य वाडेकर, श्रीपाद देशपांडे, विराजस कुलकर्णी, प्रीतीश नायक, सानिका जोग, ज्योत्स्ना सोनालकर, नितीन सावळे आणि मीना कौशल हे उत्कृष्ट प्रतिभावंत लेखक आणि त्यांचे सादरकर्ते उमेश कुलकर्णी, प्रसाद ओक, मकरंद देशपांडे, राजेश मापुस्कर, सुकन्या कुलकर्णी मोने, सतीश आळेकर, अमृता सुभाष, जितेंद्र जोशी, हृता दुर्गुले आणि अद्वैत दादरकर हे आहेत. आम्ही या कथांच्या अभिवाचनासाठी खूप उत्सुक आहोत. दिग्गज सादरकर्ते अभिवाचनातून: लिखाण आपल्या स्वतःच्या अनुभवाने आणि कलेने काय आणि कसे सादर करतात हे अनुभवणं प्रेक्षकांना वेगळाच आनंद देऊन जाईल.
या सर्व कथा २५ जूनपासून ते १ जुलै, २०२० पर्यंत www.aghaazproductions.com या वेबसाइटवर ऑनलाइन उपलब्ध आहेत.