By  
on  

रेणुका शहाणेंना अव्वाच्या सव्वा वीजबिल, ट्विट करत व्यक्त केला संताप

वीज कंपन्यांचा  मनमानी कारभार पुन्हा एकदा सर्वांसमोर आला आहे. नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूला ३६ हजारांचं वीजबील पाठवण्याचा पराक्रम वीज कंपनीने केल्यानंतर त्यापाठोपाठ आता अभिनेत्री रेणूका शहाणेंनासुध्दा २९ हजारांचं वीजबील पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे रेणुका यांचा पारा चढल्याने त्यांनीही ट्विटरवर वीजबिलाचा फोटो ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. 

तसंचअचानक बिलामध्ये लक्षणीय वाढ कशी काय झाली हा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. . ‘मे महिन्यात माझे वीजबिल ५५१० रुपये होते. त्यानंतर जून महिन्याच २९,७०० रुपये आले. या महिन्याच्या बिलामध्ये मे आणि जूनचे एकत्र बिल देण्यात आले आहे. तुम्ही मे महिन्याचे बिल १८०८० रुपये दाखवले आहे… पण माझे बिल ५५१० रुपयांवरुन १८०८० रुपये कसे झाले?’ हे कोडं उलगडण्यासाठी  रेणुका यांनी कंपनीला ट्विटच्या माध्यमातून विचारलं आहे. 

 

रेणुका शहाणे या  सोशल मिडीयाच्या माध्यमातून नेहमीच व्यक्त होत असतात. सामाजिक विषयांवर भाष्य करतात, आपली मतं मांडतात तर कधी कोणाला मदतीसाठी आवाहनसुध्दा करतात. यापूर्वी तापसी पन्नूने सोशल मीडियावर वीजबिलाचा स्क्रिनशॉट शेअर करत संताप व्यक्त केला होता. तिला वीज कंपनीने तब्बल ३६ हजारांचं वीजबिल पाठवलं होतं.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive