नियमांचं पालन करण्यासाठी महाराष्ट्र पोलीसांनी असं केलं आवाहन, या मराठी सिनेमाची करुन दिली आठवण

By  
on  

लॉकडाउनच्या काळात डॉक्टर आणि इतर आरोग्य आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसह पोलीसांचेही मोठं योगदान आहे. शिवाय हे पोलीस सध्याच्या परिस्थितीत नियम पाळण्यासाठी विविध आवाहन करत आहेत. त्यातच महाराष्ट्र पोलीस सोशल मिडीयावर हटके पध्दतीने लोकांना आवाहन करताना पाहायला मिळतात.
यंदाही महाराष्ट्र पोलीसांनी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्यासाठी चक्का टाईमपास या मराठी सिनेमाची आठवण करून दिली. ते या पोस्टमध्ये म्हणतात की, "आई-बाबा आणि साई बाबा ची शप्पत घेऊन सांगतो सर्व नियम पाळेन" कृपया 'टाईमपास' करण्यासाठी घराबाहेर पडू नका. तसेच अत्यावश्यक कारणासाठी बाहेर असताना सर्व नियमांचे पालन करा.”

 

दिग्दर्शक रवी जाधव यांच्या 'टाईमपास' या सिनेमातील प्रसिध्द डायलॉगचा वापर करून सर्व नियम पाळण्याचं आवाहन यातून करण्यात आलं आहे. दगडू आणि प्राजू या फोटोत पाहायला मिळत आहेत. अशा मजेशीर विनोदी पध्दतीने लोकांपर्यंत महत्त्वाचा संदेश पोहोचवण्याचं काम महाराष्ट्र पोलीसांच्या या सोशल मिडीया अकाउंटवरुन होताना पाहायला मिळतं.
 

Recommended

Loading...
Share