माधुरी दीक्षितने केली पती श्रीराम नेने यांची ही खास हेअर स्टाईल, पाहा फोटो

By  
on  

लॉकडाऊन काळात प्रत्येकजण स्वावलंबी बनला आहे. नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला जातोय. मोकळा वेळ सत्कारणी लावण्यासोबतच आपली आवड, छंदसुध्दा जोपासले जातायत. याला सेलिब्रिटीसुध्दा अपवाद नाहीत. बॉलिवूडची धकधक गर्लसुध्दा आपल्या आवडत्या गोष्टी करताना सोशल मिडीयावरुन नेहमीच पाहायला मिळते. नुकतंच लॉकडाऊनमध्ये  माधुरीने पती डॉ. श्रीराम नेने यांची हेअरस्टाईल चक्क स्वत: केली. दोघांचा एक सुरेख फोटोसुध्दा यानिमित्त पोस्ट केला. 

सोशल मिडीयावरुन ही पोस्ट करत माधुरी म्हणते, क्वारंटाईनचा १०० वा दिवस.  राम यांची हेअरस्टाईल करताना धम्माल मज्जा आली. पण महत्त्वाचं म्हणजे हे क्वारंटाईनचे दिवस खुप काही आपल्याला शिकवून जातात. त्यापैकी सर्वात महत्तवाचं म्हणजे आत्मनिर्भर कसं व्हायचं ते. 

 

माधुरी दीक्षित नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असते, विविध अपडेट्स ती चाहत्यांसोबत शेअर  करते. माधुरीच्या या नव्या फोटोवरही चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Recommended

Loading...
Share