By  
on  

माझी मैत्रीण आणि गुरु सरोज खान यांच्या निधानामुळे मी उध्वस्त झाले : माधुरी दीक्षित

सरोज खान यांनी १९८८ मध्ये तेजाब या चित्रपटातील ‘एक दो तीन’ हे गाणे कोरिओग्राफ केले होते. अभिनेत्री माधुरी दिक्षितचे हे गाणे त्यावेळी सुपरहिट ठरले  होते. आज कल है इंतजार.. या गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन त्यांनी केलं होfतं. इतकंच नाही तर चोली के पिछे क्या है..आणि गेल्यावर्षी आलेल्या कलंक या मल्टिस्टारर सिनेमातसुध्दा सरोज खान यांनी गाणी कोरिओग्राफ केली होती.  माधुरी आणि सरोजजी यांच्यात मास्टरजी आणि शिष्य असं जरी नातं असलं तरी दोघीही खुप घट्ट मैत्रिणीसुध्दा होत्या. सरोजजचीच्या निधनानंतर मी उध्द्वस्त झालेय, अशा आशयाची पोस्ट नुकतीच माधुरीने ट्विटरवर केली आहे. 

 

 

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं शुक्रवारी पहाटे निधन झालं. त्या ७१ वर्षांच्या होत्या. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. १७ जून रोजी श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive