सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं शुक्रवारी पहाटे निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे.. १७ जून रोजी श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. . सरोज खान या हिंदी सिनेसृष्टीतल्या दिग्गज कोरिओग्राफर होत्या. पूर्ण बॉलिवूडला त्या आपल्या तालावर नाचवायच्या .त्यांच्यासोबत आपल्या काही मराठी अभिनेत्रींच्याही डान्सनिमत्त गाठी-भेटी झाल्या त्या आठवणींना या अभिनेत्रींनी उजाळा दिला आहे.
मराठी सिनेसृष्टीतली गुणी आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखली जामारी सोनाली कुलकर्णी हिनेसुध्दा मास्तरजींसोबतचा फोटो शेअर करत आठवणी ताज्या केल्या आहेत. सोनाली म्हणते, "मी सरोज खान यांना १९९५ पासून ओळखते. त्यांच्यासोबत दायरा, ब्राईड एन्ड प्रेज्यूडीस आणि अनेक अशा सिनेमांमध्ये सोबत काम केलं आहे. प्रचंड टॅलेंट, अचूकता आणि खुप सारी कल्पकता त्यांच्यात होती. मास्तरजी तुमच्यासारखं कोणीच होऊ शकत नाही."
I knew her since 1995.. worked with her on Daayara, Bride and Prejudice and more..Talent, perfection and bursting with creativity.. RIP Masterji There will be no one like you #RIP #SarojKhan pic.twitter.com/YO1A8bbMuL
— sonalikulkarni (@sonalikulkarni) July 3, 2020